Pages

श्री दत्तगुरू उपासना शिबिर

साधना, उपासना आणि अध्यात्म या तीनही क्षेत्रांत अनेक गोष्टी शब्दांनी सांगणे शक्य नसते — त्या फक्त अनुभवाव्या लागतात. हे शिबिर अशा अनुभूतींना तयार असणाऱ्यांसाठीच आहे. आजच्या काळात बहुतेक साधना मन, बुद्धी, चित्त आणि शरीर यापैकी एखाद्या एकाच स्तरावर अडकून राहते. पण खरी उपासना म्हणजे या चारही स्तरांचा एकत्रित सहभाग… आणि हे संघटन कसे साधायचे, त्यामागचे तंत्र काय आहे, याची झलक या शिबिरात अनुभवायला मिळेल. येथे कोणतेही वरवरचे, सर्वांना सांगण्यासारखे कार्यक्रम नाहीत. येथे मिळणारे अनुभव, दिशा आणि मार्गदर्शन हे —
🕉️ समर्पण असणाऱ्यांसाठी,
🕉️ अंतर्मनात शोध घेण्याची तयारी असणाऱ्यांसाठी,
🕉️ आणि ज्यांना खरोखर काहीतरी बदल घडवायचा आहे, त्यांच्यासाठीच.


साधनेचे टप्पे — पण फक्त पात्र साधकांसाठीच

या शिबिरात साधनेचे विविध स्तर असतील.
प्रत्येक स्तरावर साधकाची अंतर्गत क्षमता, स्थिरता आणि ग्रहणशक्ती तपासली जाईल.
ज्यांना खरेच अनुभूती हवी आहे — त्यांनीच सहभाग घ्यावा. येथे सांगितली जाणारी तत्त्वे ही केवळ वाचण्यासाठी नसतील; ती अनुभवातूनच समजतील.


वैयक्तिक अडचणी, कर्णिबाधा आणि शत्रूद्वारे केलेले तंत्र — फक्त योग्य वेळीच उलगडेल

जीवनात येणाऱ्या अनाकलनीय अडचणी, कर्णिबाधा, ऊर्जेतील असमतोल किंवा शत्रूद्वारे केलेले तांत्रिक अडथळे — यांचे शास्त्रोक्त आणि तांत्रिक विश्लेषण शिबिरात होईल. पण हे ज्ञान थेट सुरुवातीला दिले जाणार नाही. ते विशिष्ट साधनास्तर गाठल्यावरच दिले जाईल.
कारण काही गोष्टी शब्दांनी सांगण्यापेक्षा साधनेच्या सामर्थ्यानेच समजतात.


मूलविद्या – महाविद्या — केवळ पात्रांसाठीच

मूलविद्या आणि महाविद्या यांतील रहस्ये ही अत्यंत गहन आहेत. ही तत्त्वे कोणालाही सांगता येत नाहीत, ना सर्वांसाठी असतात. या शिबिरात योग्य पात्रता असणाऱ्या साधकांनाच ही रहस्ये दाखवली जातील, आणि तीही फक्त उपासना प्रत्यक्ष करून घेतल्यावरच.  काय शिकवले जाणार आहे हे सांगण्याची गरज नाही; कारण जे जाणण्यास योग्य आहेत, त्यांना ठिकाणी स्वतःच समजते.


हे शिबिर कोणासाठी?

हे शिबिर —
❌ फक्त कुतूहल असणाऱ्यांसाठी नाही.
❌ वरवरची माहिती मिळवायची आहे अशांसाठी नाही.

हे शिबिर —
✔ मनापासून साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी,
✔ स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी असणाऱ्यांसाठी,
✔ आत्मिक अनुभवांना पात्र होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आहे.

खरे साधक स्वतः ओळखतात की त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे की नाही.


ही उपासना शब्दांची नाही, अनुभवाची आहे.

ज्यांना अनुभवायचे आहे — त्यांच्यासाठी मार्ग आपोआप उघडतो.

जय गुरुदेव।


श्री गुरु दत्तात्रय

श्री दत्तात्रय- अनादिकालापासून पुजले गेलेले दैवत

दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी ! औदुंबरी नित्य वसे, भक्‍तकाम पुरवितसे !
कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी ! अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय !
त्याचे चरित वर्णू काय, सकळ तो जनी ! विनायक दास दीन, जळाविणा जैसा मीन !
ब्रम्हा-विष्णु-महेश तीन आठवी मनी !! !! ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय !!

श्री दत्तावताराचे प्रयोजन
श्री दत्तात्रेय ही देवता कशी आहे, तिचे स्वरुप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरुप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसंन्नतेचा प्रसाद म्हणुन काय प्राप्त होते; हे श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांनी रचलेल्या श्रीदत्तलीलामृताब्धिसार या ग्रंथातल्या पहिल्या दोन श्लोकात आले आहे. श्रीभगवान दत्तात्रेयांचे वर्णन करतांना श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज म्हणतात,
ॐकार ज्याचा वाचक | जगध्देतू धीप्रेरक | तोचि देव सच्चित्सुख | एक दत्त || १ ||
दत्त अज निराकार | स्वेच्छामात्रें हो साकार | अव्ययात्मा भक्ताधार | भक्तिगम्य || २ ||

अर्थ: आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्या बद्दल बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. || १ || हा जन्म रहित निराकार
आहे. भक्तांच्या इच्छामात्रे साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो. || २ ||
श्री दत्तावताराचे स्वरुप
श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच. श्री दत्तावताराच्या स्वरुपाचे चिंतन खालील शब्दात करता येईल,
मालाकमंडलुरध: करयस्त्र युग्मे मध्यस्थ पाणि युगुले डमरू त्रिशुले ।
यस्यस्त ऊर्ध्वकरयो: शुभशंखचक्रे वंदे तमत्रिवरदं भुजषट्क युक्तम् ॥

सगुण परमात्म्याची पूजा ध्यानमंत्राने सुरू होते. अर्थात या ध्यानमंत्रामुळेच आराध्य परमात्मा भक्तापुढे साकार होतो. भगवान दत्तगुरूंच्या वरील ध्यानमंत्रामुळेच त्यांचे रूप भक्तांपुढे अभिव्यक्त होते. परमात्मा भगवान श्रीदत्तगुरूंच्या खालच्या दोन हातांत माळ आणि कमंडलु, मधल्या दोन हातांत डमरू, त्रिशुळ आणि वरच्या दोन हातांत शंख आणि सुदर्शनचक्र अशा प्रकारची आयुधे षड्भुजांमध्ये धारण करणाऱ्या, भक्तांना वर देणाऱ्या, मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या अनंतकोटी ब्रह्मांडनायक, अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.
गुजरातच्या प्रख्यात दत्तभक्त श्री स्वामी रंगावधूतांनीसुद्धा ‘रंग रहस्य’ या स्तोत्रग्रंथामध्ये आपल्या अनुभूतीनुसार भगवान श्री दत्तात्रेयांचा ध्यानमंत्र प्रस्तुत केलेला आहे, तर महानुभाव नाथपंथियांनी स्वानुभावानुसार भगवान श्री दत्तात्रेयांना साकार केलेले आहे.
“भस्मोद्धलित जराधरं विभुवर” अशा शब्दावलीत शांडिल्य उपनिषदांनी भगवान श्री दत्तात्रेयांची प्रार्थना केलेली आहे तर गुलाबरावांना सुवर्णपात्र हातात घेऊन भिक्षेसाठी देशाटन करणाऱ्या भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले. प्राय: सर्वत्र भगवान श्री दत्तात्रेय यतिवेषात दिसतात. परंतु ‘दत्तात्रेय सर्वस्व’ या प्राचीन ग्रंथात भगवान श्री दत्तात्रेय राजविलासी आणि ऐश्वर्यशाली असल्याचा उल्लेख आहे. महान तपस्वी अत्रिऋषी आणि श्रेष्ठ पतिव्रता अनुसूया या दांपत्याचे ठिकाणी भगवान श्री दत्तात्रेयांचा आविर्भाव झाला.
Join us on Telegram! - https://t.me/mulvidya  


श्री दत्तगुरू उपासना शिबिर

साधना, उपासना आणि अध्यात्म या तीनही क्षेत्रांत अनेक गोष्टी शब्दांनी सांगणे शक्य नसते — त्या फक्त अनुभवाव्या लागतात. हे शिबिर अशा अनुभूतींना...